संगणकाचे प्रकार :-

संगणकाचा शोध लागल्या पासून आज पर्यंत त्याच्या आकारात बरेच बदल होत गेले .पूर्वी संगणक आकाराने खुप मोठा होता आता त्याचा आकर खुपच लहान झाला आहे. उदा . डेस्कटॉप, लैपटॉप
compute type

संगणकाचे तिन प्रकार आहेत
१) अनालोग कॉम्प्युटर
२) डिजीटल कॉम्प्युटर
३) हाइब्रिड कॉम्प्युटर

डिजीटल कॉम्प्युटर सध्या प्रामुख्याने सर्व ठिकाणी वापरले जात आहे .डिजीटल संगणकाचा वेग सुरवातीला खुप कमी होता . आता त्याचा वेग खुप प्रमाणात वाढला आहे . सध्या बाजारात 3 Ghz या पेक्षा जास्त वेगाने चालणारे संगणक बाजारात उपलब्ध झाले आहेत . हाइब्रिड कॉम्प्युटर दोन गोष्टी मधले साम्य दाखवण्यासाठी वापरले जाते . इंटेल कंपनीने (Intel Company) पेंटियम (Pentium ) या नावाचा संगणक बाजारात आणला . नंतर त्यात बदल होत गेले . पेंटियम -१ , पेंटियम -२ , पेंटियम -३, पेंटियम -४ अशा नावाच्या कॉम्प्युटर ची त्यानी निर्मिती केली . सध्या सर्वत्र उपयोगात असलेल्या पेंटियम -४ मध्ये वेग वेगले बदल झाल्या मुळे कॉम्प्युटर चा आकर लहान होत गेला . घडी करुण ठेवण्या सारखे , आकाराने छोटे अशा सिस्टिम मध्ये इलेक्ट्रानिक्स घटक , निवडक सेकंडरी स्टोरेज उपकरणे आणि इनपुट उपकरणे इन्बुल्ट असतात या सिस्टिम च्या बाहेर बिजगारिने मॉनिटर जोडलेला असतो अशा नोटबुक सिस्टिम ला लैपटॉप असे म्हणतात . संगणक आकाराने लहान झाल्या मुळे तो लैपटॉप स्वरूपात आला आणि तो कुठे ही घेवून जाणे शक्य झाले . लैपटॉप बैटरी वर चालत असल्याने तो वापरने सर्वाना सुलभ ठरले . ज्या प्रमाने मोबाइल चार्जिंग करावा लागतो तसा लैपटॉप ही चार्ज करावा लागतो .
सुपर कोंम्प्यूटर :-
हा सर्वात शक्तिशाली संगणका मधील प्रकार आहे . हा संगणक विशिष्ठ मोठ्या सस्थे मध्ये वापरला जातो . उदा . अवकाश शोध मोहिम वर कण्ट्रोल ठेवण्यासाठी नासा ही सस्था या प्रकारच्या संगणकाचा वापर करते .
मेनफ्रेम संगणक :-
हा वातानुकूलक जागेत वापरला जातो. डाटा सग्रहित करण्यासाठी ह्या प्रकारच्या संगणकाचा वापर केला जातो . उदा . विमा कंपनी
काम करण्याची पद्धत :-
संगणकाला एखादे काम करण्यासाठी ३ प्रक्रियेतून जावे लागते.
१) इनपुट डिवाइस (Input Divice)
2) सी . पी . यु . सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit)
3) आउट पुट डिवाइस (Output Divice)
डिवाइस (Input Divice) :-

संगणकाला माहिती आज्ञा देणार्या विभागाला इनपुट विभाग म्हणतात . संगणका कडून योग्य व अचूक उत्तर मीळण्यासाठी त्याला योग्य माहिती दें जरुरी असत . ज्या द्वारे त्याला माहिती दिली जाते त्यात की- बोर्ड , माउस , स्कैनर , वेब कैमरा , या भागांचा समावेश असतो .
सी .पी . यु . सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit) :-
संगणकाच्या रचने मधील सर्वात महत्वाचा भाग याला विभागाला
 संगणकाचा मेंदू ही म्हणतात . सी. पी. यु. सम्पूर्ण लहान इलेक्ट्रानिक्स भागानी बनलेला आहे . सध्या वापरण्यात येणार्या पी -४ मधे ४२ कोटि ट्रांजिस्टर बसवलेले आहेत . सी . पी . यु . ला ही दोन भाग असतात .
अ) अर्थिमटिक लॉजिक यूनिट ब) कंट्रोल
अ) अर्थिमटिक लॉजिक यूनिट :- हा विभाग संगणकाच्या महत्वाचा घटक आहे .याच्या नावा वरुनच कळते की या विभागात गणिती आणि तर्क याच्या विषयावरील माहिती तपासली जाते , त्यावर प्रक्रिया होते . बेरीज , वजाबाकी , गुणाकार, भागाकार, अशा सर्व गणिती क्रिया या विभागात केल्या जातात . तसेच एखाद्या संख्येची तुलना देखील दोन संख्ये मधून काढले जातात .
ब) कंट्रोल यूनिट :- संगणकामध्ये होणार्या सर्व क्रियेवर लक्ष ठेवण्याचे काम कंट्रोल विभाग करते. ज्या प्रमाणे मानवी शरीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याच प्रमाने कंट्रोल यूनिट संगणकाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवते .

इनपुट विभाग कोणते ही काम करण्यासाठी सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कड़े पाठवतो म्हणुन याला संगणकाचे प्रोसेसिंग यूनिट (Processing Unit) असे म्हणतात .

आउट पुट विभाग :-
इनपुट विभागाने दिलेली माहिती सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कडून प्रक्रिया होवून आउटपुट विभागाकडे पाठवली जाते . म्हणुन याला कॉम्प्युटरचे आउट पुट विभाग असे म्हणतात . उदा :- मॉनिटर , प्रिंटर
हार्डवेयर, सॉफ्टवेर म्हणजे काय?
हार्डवेयर (Hardware) म्हणजे ईलेक्टोनिक्स भागानी जोडून केलेले संगणक होय . उदा . मॉनिटर , की-बोर्ड , हार्ड डिस्क , मदर बोर्ड , कैबिनेट , माउस , सी डी रोम , आदि
.
सॉफ्टवेर (Software) म्हणजे संपूर्ण संगणकाचे चलन वळण ज्या प्रकारच्या सॉफ्टवेर कडून नियंत्रित होत असते ते सॉफ्टवेर . ऑपरेटिंग सिस्टम्स (OS) हे संपूर्ण संगणक कार्यरत करणारा एक प्रोग्राम आहे . संगणकाचे हार्डवेयर व सॉफ्टवेर शिवाय कुठलाच संगणक सुरु होत नाही . संगणक आणि त्यावर काम करणार्या व्यक्ति मधील सुस्वाद सॉफ्टवेर मुळेंच होतो .




की-बोर्ड (Keyboard) :

की-बोर्ड (Keyboard):-

की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे . की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी सव्वाद साधणे शक्य होते. संगणकाला माहिती देण्यासाठी किवा विशिष्ठ सूचना देण्यासाठी की-बोर्ड चा वापर होतो . की-बोर्ड सामान्यत टाइप रायटर सारखा असतो . जशी की आपण की-बोर्ड वर टाइप करतो तशीच अक्षरे स्क्रीन वर येतात . की-बोर्ड मध्ये काही बटन विशिष्ठ चिन्ह काढण्यासाठी असतात .

की बोर्ड चे साधारण खालील चार भाग पडतात .
१) फक्शनल की पेड़ २) अल्फा न्युमरिकल की पेड़ ३) न्युमरिकल की पेड़ ४) कर्सर की पेड़

१) फक्शनल की पेड़ :- या मध्ये F1 ते F2 अशा फक्शनल कीज असतात . ह्या सर्व विशिष्ट कामा साठीच वापरतात .
२) अल्फा न्युमरिकल की पेड़ :- या मध्ये A ते Z ही इंग्लिश मुळक्षरे असतात . एकूण २६ आणि ० ते ९ असे अंक असतात .
३) न्युमरिकल की पेड़ :- यात ० ते ९ असे अंक असतात आणि काही विशिष्ठ कीज काही विशिष्ठ कामा साठीच वापरतात .
४) कर्सर की पेड़ :- लेफ्ट, राइट, डाउन , अप ह्या जागेवर जायचे असल्यास ह्या कीज चा उपयोग केला जातो .
की बोर्ड वर कमीत कमी ८३ तर १२७ बटन असतात . सर्व साधारण की बोर्ड वर ११० कीज असतात . ज्या की बोर्ड वर ११० कीज पेक्षा जास्त कीज असतात त्याला मल्टीमीडिया की-बोर्ड म्हणतात .

की-बोर्ड CPU च्या मागील भागाला जोडले असते . की-बोर्ड नोर्मल, पीस/२ , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध आहेत .
विन्डोज़ XP मध्ये स्टार्ट मेनू वर क्लिक करून Run या आप्शन वर OSK टाइप करून ENTER बटन दाबल्या नतर एका विंडोवर एक कीबोर्ड येइल यावर माउस ने क्लिक केल्यास तेच के टाइप होतील ज्यावर आपण क्लिक करू .असा कीबोर्ड ज्या वेळेस आपला कीबोर्ड चालत नसेल काही कही कीज काम करत नसतील तेव्हा ऑन स्क्रीन कीबोर्ड कामाला येतो.
माउस (Mouse):

माउस (Mouse) :-

की-बोर्ड सारखे माउस आवश्यक इतके नसले तरी विन्डोज़च्या जगात अतीशय उपयोगात पडणारे माउस हे इनपुट उपकरण आहे . माउस द्वारे अक्षरे किवा अंक टाइप करता येत नाहीत . माउस हे दर्शक उपकरण आहे . माउस जसा आपण हलवतो तसा माउसचा पाँटर हालातो . साधारण माउस ला ३ बटन असतात . आता सध्याच्या माउस मधे २ बटन असतात आणि स्क्रोल्लिंगसाठी व्हिल २ बटणाच्या मध्ये असते . माउस CPU च्या मागील भागाला जोडले असते . माउस सीरियल , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध आहेत . माउसच्या मध्यमा मुळे ग्राफिक्स , डिजाईन , चित्र , आकृत्या काढने सहज शक्य होते . मिक्रोसॉफ्ट पैंट मध्ये माउस च्या सहाय्याने चित्र काढली जातात .
माउसचे ३ प्रकार आहेत.

मेंकेनिकल माउस :-
माउसचा हा सुरवातीचा प्रकार म्हणजेच ह्याच्या खालच्या भागाला एक लहानशी गोटी च्या आकाराचा बॉल असतो जो माउस सोबत फिरत असतो त्याची वायर CPU ला जोडली असत.
ओप्टिकल माउस :- ह्या माउस ला खालच्या भागाला गोटी नसते . माउस च्या बाहेर पडणारा प्रकाश माउसच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो .
कॉर्डलेस माउस :-
अशा प्रकारचा माउस हा बटरी वर चालतो . CPU सोबत वायरलेस द्वारे चालतो . आशा माउस ला वायरलेस माउस देखिल म्हणतात .
माउस साधारण खालील प्रकारच्या क्रिया करतो .
१) क्लिक :- माउस चे डावे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला क्लिक असे म्हणतात . एखादी गोष्ट क्लिक करून आपण निवडू शकतो .
२) डबल क्लिक :- डावे बटन लागोपाठ दोनदा प्रेस करून सोडणे म्हणजे डबल क्लिक होय . एखादा प्रोग्रम्म , फाइल ओपन उघडण्यासाठी माउस मध्ये डबल क्लिक चा उपयोग करतात .
३) राईट क्लिक :- माउस चे उजवे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला राईट क्लिक असे म्हणतात . एखादी गोष्ठी संदर्भातील सुचानांची यादी आपण पाहू शकतो स्क्रीन वर .
मदर बोर्ड (Motherboard :
मदर बोर्ड (Motherboard) हे संगणकाचे ह्रदय आहे . याला सिस्टमचा मेनबोर्ड असे ही म्हणतात. संगणका मधले सर्व डिव्हाईस एकत्र आणण्याचे काम मदर बोर्ड करतो. मदर बोर्ड वरील कॉम्पोनेन्ट आपला संगणकाचा प्रकार त्याची कार्यक्षमता , मर्यादा ठरवतो मदरबोर्ड को - प्रोसेसर , बायोस , मेमरी तसेच अनेक स्लोट असतात. मदर बोर्डसर्व कार्ड ला सपोर्ट करतो उदा. टीवी टुनेरकार्ड , साउंडकार्ड , डिस्प्ले कार्ड .
मदर बोर्ड विकत घेताना जास्तीत जास्त प्रकारच्या इंटरफेस आणि स्टैण्डर्ड कंट्रोल्स असलेला घेण चागले असते. मदर बोर्ड मध्ये मेमरी चिप्स स्पेशल वेगळा सेट असतो जो मेमरी पेक्षा वेगळा असतो व प्रोग्राम सुरु होण्यासाठी उपयोगी पडतो या अतिरिक्त मेमरीला बोंयस् असे म्हणतात.
मदर बोर्ड हा CPU मध्ये जोडलेला असतो त्याला SMPS च्या सहाय्याने व्होल्टेज दिले जाते याच मदर बोर्डवरुन प्रोसेसर ही जोडलेला असतो . ATX आणि AT असे दोन भाग या मदर बोर्डचे आहेत ATX मदर बोर्ड सध्याच्या कॉम्प्युटर मध्ये वापरले जातात
प्रोसेसर (Processor):

ज्या प्रमाने मानवी शरीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याच प्रमाने प्रोसेसर संगणकाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवते 8०८८ हा PC च्या युगातील पहिला मायक्रो प्रोसेसर आहे . प्रोसेसरला मायक्रो प्रोसेसर ही म्हणतात कारण तो लहान भागानी अती सूक्ष्म अशा इलेकट्रोनिक्स भागानी बनला आहे . हा मदर बोर्ड वरच्या सोकेट वर बसवला जातो . सिलिकन लयेर्सनी बनलेला असतो ह्या मध्येच अर्थिमटिक लॉजिक यूनिट व कंट्रोल यूनिट आहे . प्रोसेसर प्रोसेसिंग करताना गरम होवू नये या करता त्याच्यावर Heat Sink व Fan लावला जातो . 8०८८ नत्तर ८०२८६, ८०३८६, ८०४८६ असे अधिक वेगवान प्रोसेसर इंटेल कंपनी ने बनावले . त्यां नंतर त्या कम्पनी ने पेंटियम नावाची सीरिज काढली त्यात प्रोसेसरला त्याच्या स्पीड ने नावे देण्यात आली पेंटियम , पेंटियम १, पेंटियम २, पेंटियम ३ आणि सध्या सर्वत्र संगणका मध्ये जास्त प्रमाणात वापरला जाणारा पेंटियम ४ त्याला P-IV देखिल म्हणतात . पेंटियम ची सुरवात झाली तेव्हा त्याचा स्पीड 60MHZ एवढा होता आता 2 Ghz पेक्षाजास्त आहे सध्या डिवो कोर , डुअल कोर प्रोसेसर उपलब्ध आहेत ह्याची विशिष्ट आशी आहेत की हे बाकीच्या प्रोसेसर पेक्षा जास्त स्पीड ने काम करतात . शिवाय दोन प्रोसेसर असल्याने एक खराप किवा निकामी झाल्या मुळे दुसर्या प्रोसेसर वर पीसी सुरु राहु शकतो . Celeron Microprocessor हा P-II सारखा आहे पण यात Cache मेमोरी कमी आहे . हा जलद आणि स्वस्त आहे आता २ GHZ ते ३.८ Ghz पर्यंत हा उपलब्ध आहे .
को -प्रोसेसर :-
गणित किवा अवघड अशी उदा. सोडवण्यास को प्रोसेसर मुळे मदत होते सध्याच्या मायक्रो प्रोसेसर मध्ये बिल्ट इन मायक्रो को प्रोसेसर आहेत . 
मेमरी (Memory):

CPU म्हणजे प्रोसेसर नतर मेमरी हा संगणकाचा महत्वाचा भाग आहे. मेमरी म्हणजे स्मरणशक्ति होय. ही मेमरी CPU मध्ये मदर बोर्ड वर स्लोट मध्ये लावली जाते . या कंप्यूटरच्या मेमरिचे २ भागात वर्गीकरण केले जाते . १) रीड ओनली मेमरी (Read Only Memory) २) रंण्डम एक्सेस मेमरी (Random Access Memory)

१) रंण्डम एक्सेस मेमोरी (Random Access Memory) :-
RAM साधारण डाटा स्टोर करण्यासाठी उपयोगी येते . Ram ही Volatile आहे या मुळे पीसी बंद केला की डाटा नष्ट होवून जातो . RAM चे ही २ प्रकार आहेत .१) Static Ram २) Dynamic Ram Static Ram ला एकादी माहिती भेटली की ती पीसी जोपर्यंत बंद होत नाहीं तो पर्यंत तशीच राहते . याला ३० किवा ७२ पिंस असतात . Dynamic Ram ला डाटा Maintain करण्यासाठी Constant रेफ्रेशिंग लागते आणि हे अतिशय जलदगतीने होते . याला १६८ पिन्स असतात आणि ही RAM Statics Ram पेक्षा स्वस्त मिलते .

२) रीड ओनली मेमोरी (Read Only Memory) :-
नावामध्ये सांगीतल्या प्रमाणे ही मेमरी फ़क्त वाचण्यासाठी होतो.यात माहिती पुसता किवा बदलता येत नाही. कॉम्प्युटर सुरु केला की बूट स्टार्ट अप मध्ये ही मेमरी वाचली जाते. पीसी बंद असला तरी ही माहिती डाटा पुसला किवा नष्ट होत नाही .
डीडीआर रंम (DDR RAM) :- आलिकड़च्या काळात ह्या DDR RAM खुप नावाजल्या आहेत . याच कारण अस की ह्या मेमरिचा स्पीड बाकीच्या मेमरी पेक्षा डबल असतो आणि त्या कमी ही त्याच स्पीड ने करतात . SD Ram पेक्षा ह्या प्रकारच्या RAM दुप्पट डाटा ट्रान्सफर करतात शिवाय ह्या स्वस्त ही आहेत बाकीच्या मेमरी पेक्षा ह्यांचा स्पीड DDR 266Mhz च्या पेक्षा जास्त आहे.
हार्ड डिस्क (Hard Disk) :
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjq-BY7lKZ9i4XDy52aXdd7lmpH2-EQG6S00Ifr6OdlR2ENJbT3XYHIab6irRE0x_3onpH0TTEY8fkGgsXz3pBZJKqrq3kaT0oHV-VjdAwUytV3IGMoAsAMfBp5-9CxAuuQvj7Fnb7fCFyl/s320/z_ibm_ultrastar36zx.jpg
हार्ड डिस्क संगणकाच्या CPU मध्ये बसवलेली असते . ती फ्लोपी प्रमाणे सहजरित्या बाहेर काढली जात नाही . हार्ड डिस्क पेटि प्रमाणे असते . याच पेटी मध्ये ३ ते ८ डिस्क एकावर एक अशा रचलेल्या असतात . या पैकी प्रतेक ट्रैक्स व सेक्टर असतात प्रतेक डिस्कला रीड राइट हेड असतात .
पूर्वीच्या हार्ड डिस्क च्या आकाराने हल्लीच्या हार्ड डिस्क अतिशय लहान आकारात उपलब्ध झाल्या आहेत . हार्ड डिस्क मध्ये माहित फ्लोपी डिस्क पेक्षा किती तरी जास्त पटीने साटवता येते .
आता बाजारात 20Mb पासून ते 80Gb पेक्षा जास्त आकारात उपलब्ध आहेत . संगणका मध्ये जी माहित साठवली जाते ती म्हणजे हार्ड डिस्क मध्ये . हार्ड डिस्क हा एलेक्ट्रोनिस्क भाग आहे या मुळे तो कधी ही ख़राब होवू शकतो बिघडू शकतो . म्हणुन हार्ड डिस्क वरील डाटा ची माहिती दुसया हार्ड डिस्क वर अथवा CD वर Backup म्हणुन घेतली जावू शकते . शिवाय डाटा लॉस झाला तरी तो रिकोवर करता येतो .
आता बाजारात साटा हार्ड डिस्क आल्या आहेत ह्या नोर्मल हार्ड डिस्क पेक्षा जास्त वेगाने डाटा ट्रान्सफर करतात आणि त्यांची डाटा साठवून ठेवण्याची क्षमता जास्त आहे 300Gb पेक्षा जास्त क्षमता असणारी हार्ड डिस्क अतिशय अल्प दरात मिळते.


फ्लोपी डिस्क ड्राइव (Floppy Drive)

फ्लोपी डिस्क ड्राइव (Floppy Drive) संगणकाच्या CPU मध्ये बसवलेला असतो ह्याचा पुढील भाग ज्या मधून फ्लोपी आत टाकली जाते तो भाग CPU च्या पुढील भागातून दिसतो . त्या फ्लोपी ड्राइव ला SMPS मधून व्होल्टेज पॉवर वोल्टेज दिले जाते . मदर बोर्ड वरून फ्लोपीडिस्क केबल फ्लोपी ड्राइव ला संपर्कासाठी जोडलेली असते . ३.५" च्या फ्लोपी सध्या मार्केट मध्ये उपलब्ध आहेत . त्यामुळे त्याच आकाराच्या फ्लोपी डिस्क मिळतात . पूर्वी ५.१/२ " च्या फ्लोपी ड्राइव असत त्यामुले ५.१/२ " च्या फ्लोपी मिळत त्यांची माहिती साठवण्याच्या क्षमते पेक्षा सध्या जास्त डाटा त्यात साठवता येतो . १.४४ एम्. बी. एवढ्या साइज़ची माहित ह्या ३.५" फ्लोपी मध्ये साठवता येते .फ्लोपी च्या चोकोनी आवरणा खाली माहिती साठवण्यासाठी गोलाकार चुबकीय गुणधर्म असलेला पदार्थापासून माहिती साठवता येते .या डिस्कवर प्रतेक ट्रैक्स असतात . प्रतेक ट्रैक्स अनेक सेक्टर मध्ये विभागले असतात . रीड राइट स्केटर द्वारे माहिती राइट किवा रीड केले जाते . फ्लोपी मधील माहिती राइट किवा रीड करण्यासाठी फ्लोपी ड्राइव मध्ये टाकली जाते . शिवाय डाटा डिलीट होवू नये याकरीता फ्लोपी वर राइट प्रोटेक्शन नोंच असते . ह्या नोँच च्या मदतीने आपण फ्लोपी मधला डाटा बंद करू शकतो . परन्तु आता सध्या फ्लोपी वापरण्याचे प्रमाण कमी होत लागले आहे . 
सीडी रोम/ राईटर :


हल्ली फ्लोपीचा जमाना निघून जाउन सीडीचा जमाना आला आहे . कारण ही त्याला तशेच आहे . सीडी ही कमी कीमती मध्ये सध्या उपलब्ध झाली आहे . शिवाय फ्लोप्लीच्या पेक्षा कित्तेक पट माहिती सीडी मध्ये साठवाली जाते . शिवाय फ्लोपी ही कधी ही डैमेज होवू शकते खराप होवू शकते या मुळे त्यातील माहिती नष्ट होते . सीडी मध्ये ह्या सर्व संभावना खुपच कमी असतात .

700 MB येवढी माहिती CD मध्ये साठवाली जाते . ह्या CD मध्ये सुद्धा चुम्बकीय पदार्थाने बनवली असते . Cd वर लिहिलेलं माहिती खोड़ता येत नाही . म्हणुन याला ROM असे ही म्हणतात . Re-Writeable CD वर फ़क्त माहिती बऱ्याच वेळा लिहिता अथवा खोडाता येते . CD मधली माहिती रीड करण्या साठी CD रोम ड्राइव ची गरज असते . हा सीडी रोम ड्राइव CPU मध्ये बसवला असतो . हा देखिल फ्लोपी ड्राइव प्रमाणे CPU च्या बाहेर असतो म्हणजेच त्याच तोंड बाहेरून दिसते आणि त्या तिथूनच CD रीड केली जाते . सीडी रोम ड्राइव ला SMPS मधून व्होल्टेज दिले जातात . CD मधला डाटा रीड होत असताना सीडी रोम ड्राइव ची लाईट ब्लिंक होते .
डीवीडी रोम ही सीडी रोम सारखा असतो त्यात डीवीडी आणि सीडी रीड होते . सीडी राईटर मधे सीडी राइट होते तर डीवीडी राईटर मधे सीडी + डीवीडी राइट होते . डीवीडी ही ४ जीबी किवा ८ जीबी एवढ्या कैपसिटी मध्ये उपलब्ध आहे . संगणकाच्या सीडी किवा डीवीडी मध्ये असणारे फाइल , फोटो , मुव्हिज आपल्या सीडी किवा डीवीडी प्ल्येअर मध्ये आपण RUN करू शकतो .
एस.एम.पी.एस. (SMPS) :


एस.म.पी.एस. (Switch Mode Power Supply) :- संगणकाला गरज असते ती Direct Crrent (DC) विजपुरवठ्याची . संगणका चे इलेक्ट्रॉनिक घटक चालवण्यासाठी आणि डेटा सूचनांचे पालन करण्यासाठी त्याला विजेची आवशकता असते . एस.म.पी.एस. हे एसी वोल्टेज DC मध्ये कनवर्ट करतो . कैबिनेट हे विविध शेप, स्टाइल आणि साइज़ मध्ये उपलब्ध आहेत त्या कैबिनेट मध्येच एस.म.पी.एस. बसवूण मिळतात. SMPS दोन प्रकारचे आहेत . AT आणि ATX अश्या स्वरूपात आहेत .
ATX SMPS सध्या बाजारात उपलब्ध आहेत . आणि तेच जास्त वापरात आहेत . एसी व्होल्टेज कनवर्ट करून मदर बोर्ड आणि अन्य उपकरणाला सप्लाई देतो . SMPS एक बॉक्स सारखा असतो . SMPS चे वजन हलके आणि आकाराने लहान असते . त्यात एक फंखा लावलेला असतो जेन्हे करून SMPS जास्त गरम होवू नये . SMPS मधून हार्ड डिस्क , सीडी रोम , फ्लोपी ड्राइव , आणि मदर बोर्ड ला सप्लाई देतो . एस.म.पी.एस. एक fuse असतो व्होल्टेज जास्त जाले की तो डैमेज होतो . त्या मुळे System ला एफ्फेक्ट्स होत नहीं. लैपटॉप मध्ये ही एसी एडाप्टर असते जे system च्या बाहेर असते . नोट बुक ची ब्याटरी या मुळे २ ते ३ तास विज पुरवठा साठवूण ठेवतो . 


0 comments